टिंग टॉंग ऑनलाईन – व्यापार करण्याची नवीन पद्धत

tingtong onlineटिंग टॉंग ऑनलाईन – व्यापार करण्याची नवीन पद्धत

टिंग टॉंग ऑनलाईन – व्यापार करण्याची नवीन पद्धत

2020 च्या मार्च महिन्यात कोरोना महामारीने आपल्या देशात शिरकाव केला आणि संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची वेळ सरकारी यंत्रणेवर आली. हा लॉकडाऊन चा काळ सर्वांसाठी अत्यंत भयंकर होता, आणि विशेषतः व्यापार जगताला लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला. कित्येक मजुरांनी स्थलांतर केले, हातावर पोट असणाऱ्या कित्येक मजुरांवर कामगारांवर, विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली,कित्येकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. सरकारने मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ‘सरकारी काम आणि अनेक महिने थांब’ हही म्हण आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे, आणि झालं ही तसच. कित्येक लाभार्थी मदतीपासून वंचित राहिले आहे त्यांना उपासमारीचा सामना करावा लागला.

आज पहिला लॉकडाऊन लागून वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला पण स्थित काही बदलली नाही, आपण पुन्हा लॉकडाऊन च्या छत्रछायेखाली जगत आहोत, परंतु आता मजुरांवर, कामगारांवर उपासमारीची वेळ येणार नाही. कारण त्या प्रत्येकाला टिंग टॉंग ऑनलाईन च्या माध्यमातून मदतीचा हात घेऊन युवा उद्योजक उदय अशोक पवार पुढे आले आहेत. आपण ज्या समाजात राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो या भावनेने उदय पवार गेली कित्येक वर्षे सेवा पुरवत आहेत आणि याच सेवा भावनेतूनच टिंग टॉंग ऑनलाईन ची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली.

आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी फळवाला,भाजीवाला, मेकॅनिक, प्लंबर, सुतार, किराणा दुकानदार अशा घटकांची आपल्याला गरज लागतेच. आणि गरजेच्या वेळी अशा लोकांना शोधण्यात आपला जास्त वेळ जातो आणि तोच वेळ जाऊ नये आणि लवकरात लवकर तुम्हाला सेवा मिळावी यासाठी टिंग टॉंग ऑनलाईन हा सर्वोत्तम पर्याय तुमच्यासमोर आहे. सेवा पुरवणारा कोणताही व्यक्ती असेल म्हणजे तो फळविक्रेता असेल किंवा मग मोठा व्यावसायिक सगळ्यांसाठी टिंग टॉंग ऑनलाईन वर्षाचे ३६५ रुपये इतकाच दर आकारते. म्हणजे प्रतिदिन एक रुपया भरून तुम्ही तुमचा व्यापार यशाच्या एका उंचीवर घेऊन जाऊ शकता.

बदलत्या काळानुसार व्यापार करण्याच्या पद्धती बदलण्याची गरज आहे आणि टिंग टॉंग ऑनलाईन च्या माध्यमातून ह्या बदलाची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे व्यापारात किंवा व्यवसायात लॉकडाऊन मध्ये होणाऱ्या तोट्याचा विचार अजिबात करू नका टिंग टॉंग ऑनलाईन परिवाराचा सदस्य व्हा आणि भरगोस नफा मिळवा.Post comment

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?